कुणाच्या शरीरावरती चौर का डुलावा हो ?

(चालः खुलविते मेंदी माझा रंग...)
कुणाच्या शरीरावरती चौर का डुलावा हो ?
कुणा कासयासी शोक ? सगळे    सारखेची   लोक ॥धृ 0॥
कुणी शेतीवाडी करी कुणी खादी विणती सारी ।
कुणी कष्टवोनी सगळ्या का   स्वये    फुलावा    हो ? ॥१॥
कुणी बुध्दिच्या आधारे अज्ञ जना शिक्षण देती ।
म्हणुनि काय तो   उपयोगी     विशेषे     तुलावा    हो ॥२॥
कुणी मानवांची सेवा अन्य प्रकारांनी करिती ।
म्हणानि नीच समजुनि त्यासी कुणा का सलावा हो ? ॥३॥
जगन्नियंत्याने केली सृष्टि सारखीच सगळी I
म्हणे दास तुकडया रिपुही - उगिच का खलावा   हो ? ॥४॥
         बुलढाणा - प्रवास दि . २१- ०३- १९५५