आम्ही आपुल्या भरवशावर जगतो

(चालः मानवांनो माणुसकीला जागा...)
आम्ही आपुल्या भरवशावर जगतो
सांगा कोणता शहाणा हे म्हणतो ? ॥धृ 0॥
जिवनाची सामुग्री सारी । काय एकट्याने होतसे पुरी |
सेन्यावाचूनि राजा    का    बनतो ? ॥ सांगा 0 ॥१॥
माझे सुंदर शोभले हे घर । फळाफुलांनी आणली बहर ।
यासाठी    एकटा    का    श्रमतो ? ॥ सांगा 0 ॥२॥
कुणी शेतीचे पुरविती अन्न । कुणी देई अन्न शिजवून ।
मीच     सर्व    निर्माण   हे    करतो ? सांगा 0 ॥३॥
नेसायासि उंच धोतर I विणले हे भरजरीदार ।
हे  सर्व     आम्ही     का    करतो ? ॥ सांगा 0 ॥४॥
हे सगळयांनी मिळुनी केले I ते सगळ्यांच्या कामासि आले I
अभिमानाने आम्हीच का तनतो ? ॥ सांगा 0 ॥ ५॥
दुसऱ्याचे घेता सुख वाटे I परी देतांना का यावे काटे ?
दास तुकडया म्हणे सगळा भ्रम तो ॥ सांगा 0 ॥६॥
        _ नागपूर दि .३०-०३-१९५८