वेडी ही आशा कसली दिवाळी करते ?
(चालः पायोजी मैने रामरतन धन पायो...)
वेडी ही आशा कसली दिवाळी करते ? ॥धृ0॥
घरदाराची चिंता सगळी मारे मारे फिरते ॥१॥
आज कमाई रात्रिच होळी उद्या उपाशी रडते ॥२॥
सहानुभूतिची ओल न कोठे हडहड चहुकडे पुरते ॥३॥
आज कर्ज अणि उद्याच फाशी मति शरमेने मरते ॥४॥
तुकड्यादास म्हणे जव ना हे दुर्गुण - सारे विरते ॥५॥
- कळाशी दि. १०-१०-१९५७