चित्ती तुझे ध्यान स्थिरवू दे
( चाल : हसले मनी चांदणे .. )
चित्ती तुझे ध्यान स्थिरवू दे I
रुचो न धन - जन विषय - पाप हे
इंद्रीय - सुख मुरवु दे ॥ धृ 0॥
सहज समाधी अंतरी जडली ।
सोऽहं नादे स्वरुपी भिडली ।
सकल भेद हरवू दे ॥१॥
अखिल विश्व हे अलंकार मम ।
मी सर्वांतरि जिवाजिवी सम ।
हा निश्चय विहरु दे ॥२॥
जीवन जरि व्यवहारी असले ।
तुकड्या म्हणे तरि द्वेष न कसले ।
कुटुंब हे बहरु दे ॥३ll
- सतना घाट दि. ०१ - ०३-१९५५