आम्हा ठावे आहे ऐसे |
आम्हा ठावे आहे ऐसे । पुढे होतसे कायसे ॥ धृ ॥
बहु चळतील लोक । कोणी न घालतील भीक ॥ १ ॥
कोणी म्हणतील "गेला । मार्गावरूनि उतरला" ॥ २ ॥
तुकड्या म्हणे सर्व चाले । परी ना सुटावी पाउले ॥ ३ ॥