सावळा घनश्याम माझा, पाहिला का हो कुणी

सावळा घनश्याम माझा, पाहिला का हो कुणी?
कुंजबनिच्या बंसिबाला, प्राहिला का हो कुणी? ॥]धृ०1।
मंदिरी, ज्छंषि-आश्रमी, श्रृति, शास्त्र बघता, ऐकता |
संत-साधू बर्णिती, महती तयाची ळीर्तनी ।1२ 1।
योगिजञन ध्याती तया, योगांग, साधुनि पाहुण्या ।
ताप्रसी तप साधती, पण येइना त्यांचे मनी 1२ ।।
मुग्ध बसल्या गोप गोपी, वृष्ण-मुख चितावया |
गायि ना शिवती लृणा, टकबकारुनी बघती बनी ।1३ 11
भारताची ही दशा, पहाया तरी या हो म्हणा।
आकळे ज्याला प्रभू, सांगा तरी कुणि जाउनी ।।४॥।
ग्रंथ, गीता बोलती- राहतो प्रभू प्रेमापुढे ।
ऐकलेची एकदा, दिसले न तेव्हापासुनी ।।५॥।
मार्ग तरि सांगा मला, जाऊ कुठे बघण्या तया ?
दास तुकड्या वांच्छितो, हो दर्शनचि या लोचनी ।1६॥।