काय म्हणाल ते म्हणा I
काय म्हणाल ते म्हणा । परि मी न सोडी मोहना ॥ धृ ॥
म्हणा भ्याला संसारासी । परि मी न सोडी तयासी ॥ १ ॥
म्हणा जाहला भिकारी । परि मी न सोडी श्रीहरि ॥ २ ॥
तुकड्या म्हणे सकळ लाज । देवा अर्पिली सहज ॥ ३ ॥