सर्व करी माझा हरी I
सर्व करी माझा हरी । लीला नाटक नटधारी ॥ धृ ॥
पाहे भक्ताची कसोटी । देई हातीहि नरोटी ॥ १ ॥
लोकी करवितो अपमान । आणी मार्गामाजी विघ्न ॥ २ ॥
तुकड्या म्हणे ओळखून। देव दाखवी चरण ॥ ३ ॥