जावो काय काय जाते I
जावो काय काय जाते । तरी उत्तम आम्हाते ।। धृ ॥
घर जावो, धन जावो । मान जावो, प्राण जावो ।। १ ॥
मित्र जावो, गोत्र जावो । प्रेम जावो, नेम जावो ।। २ ॥
परी न जावो हा देव । तुकड्या म्हणे ऐसा भाव ॥ ३ ॥