जग दुहेरी तोंडाचे I
जग दुहेरी तोंडाचे । एक नेम नाही वाचे ॥ धृ ॥
घरी बसता घरघुसा । निघता बाहेरी म्हणती पिसा ॥ १ ॥
स्वस्थ बसता म्हणती मुका । बोलघेवडा बोलका ॥ २ ॥
तुकड्या म्हणे काही राहो । आम्ही आपुलेचि पाहो ॥ ३ ॥