किती उरली वेळ आता, देवा! यावया तुम्हा?

किती उरली वेळ आता, देवा! यावया तुम्हा? ।।धृ०।।
धर्मभ्रष्ट नयनी दिसती, वाधडली जणी या कुमती ।
धर्म-व्रत न लागे हाती, पहावया तुम्हा ।।1।।
साधू, संत छळणी आले, असुरि राज्य सारे गिळिले ।
श्रेष्ठ अहंतेने. चळले, पावले भ्रमा॥।२1॥।
मातृभूमि रुसली सगळी, तृप्तिसि ना धान्या उफळी ।
गो-पशुसी देताति बळी, जाहली सिमा।।३॥।
शांतविण्या तुकड्यादासा, आठवावयासी श्वासा ।
उरलि एक तुमची आशा प्रभू! नमोनमा! ।।४॥।