कुणाच्या भरवशावरती करु अभिमन हो ?

( चाल : फुलविते मेंदी माझा रंग ... )
कुणाच्या भरवशावरती करु अभिमन हो ?
कोण पुरवी आस ? मजला देई जो जीवनदान हो ॥धृ0॥
वाहलो चहू बाजूनी वासनेत फसुनी सारा ।
विखुरल्या वृत्ती साऱ्या नाही मानपान  हो ! ॥१॥
वनी-रानी वृक्षा तळुनी पशु-पक्षी शांत दिसती ।
परी आमुच्या हृदयाला जरा ना कमान हो ! ॥२॥
अगे माऊली ! गुरुदेवा ! हाक घेशी का तुकड्याचि ?
ब्रीद जरा सांभाळोनी वाचविना प्राण   हो ! ॥३॥
- प्रवास दि. २१-०३-१९५८