चित्त विषयापासुनिया भंगलं

( चाल : कमरेला कमरपट्टा..)
तुझ्या ध्यानात मन हे रंगलं ।
चित्त विषयापासुनिया भंगलं ॥धृ0॥
होत जीवनात केल जे पाप ।
आला त्याचा आता संताप ।
सऱ्या व्यसनांच डोंगर खंगलं । चित्त 0 ॥१॥
तुझ्या दरबारी झुकता शीर ।
गेल नासोनि अज्ञान-तिमिर ।
स्वच्छ झाल हृदय होत जंगलं । चित्त 0॥२॥
डोळा पडता तुझे हे चरण ।
झाले बेभान मन उन्मन ।
जीवाशिवाचं प्रेम  हे   जमलं । चित्त 0 ॥३॥
आता आलो मूळ स्थानासी ।
गुरुदेवानं दाखविली काशी ।
म्हणे तुकड्या कोड  उमगलं । चित्त 0 ॥४॥
- नागपूर दि. २७-०३-१९५७