सुंदर वनवृक्षांची दाटी लता-फुलांनी सजली सुष्टी ।

(चालः उम्बरठ्यावर...)
सुंदर वनवृक्षांची दाटी लता-फुलांनी सजली सुष्टी ।
इथेच बसती मुनी चलाना दर्शन घेण्या झणी ॥धृ0॥
ध्यान धराया अती शांतता गाभीर्याने प्रभुसी गाता ।
स्थान आवडे मनी ॥ चलाना 0 ॥१॥
भोवताल ही सुंदर झरणे लपुनी छपुनी पडती किरणे ।
मंजुळ वाटे   ध्वनी ॥चलाना 0 ॥२॥
तुकड्यादासा प्रेम मिळाले एकांती मन उन्मन झाले ।
सुटेचिना   मोहनी ॥ चलाना 0 ॥३॥