तया कलियास हाक मारी

तया कालियास हाक मारी स्त्री ते । कोणी आला येथे,धावा तुम्ही ॥
उठे तो विषारी क्रोधी, यमुनेचा । कल्लोळ पाण्याचा न मायेचि ॥
आला होता तेथे श्रीहरी ज्यासाठी । दोघांचीही गाठी पड़े तेव्हा ॥
क्रोधावला काळ ग्रासीन मी म्हणे । पाहुनिया तान्हे तुकड्या म्हणे ॥