चल ऊठ भारता ! आता, ही वेळ नसे निजण्याची

चल ऊठ भारता ! आता, ही वेळ नसे निजण्याची ।।धृू० ।।
बुद्धिच्या तळावर ज्योती, झळकू दे कर्तव्याची।
ही झुगार बंधन सारी, जी देव देव म्हणण्याची ।
(अंतरा) आठवी ऋषींच्या बोला
कुछ मिळे न बलहीनाला ।
का सचिंत ऐसा झाला ?
करि याद कृष्ण-गीतेची, पर्वा न ठेव मरण्याची ।।१।।
करि स्वतंत्र देहा अपुल्या, करि स्वतंत्र गावा अपुल्या
करि स्वतंत्र राष्ट्रा अपुल्या, करि स्वतंत्र देशा अपुल्या।
(अंतरा) हा धर्म मानशिल जेव्हा।
नर-जन्म सफल हा तेव्हा
तो पुरुष धन्य मानावा!
करि कृतार्थता मातेची, पर्वा न ठेव मरण्याची ।। २ ।।
कुणि वदले तुजला ऐसे? जग-धर्म फिरे ना केव्हा।
रंगतो कोण न तुज ऐसे? क्रषि होति न जेव्हा तेव्हा।
(अंतरा)  देश - काल - समयावरती ।
परिवर्तन धर्मा  देती ।
विराज अते त्याल, पी ह ठेव मरण्याची ।।३ ||
सांगतो देव का ऐसा, मंदिरीच सहावे तुम्ही?।
(अंतरा) होऊ द्या नाश देशाचा कुप कामी
होउ द्या नाश देहाचा।
हा शब्द नसे देवाचा।
घे याद पुन्हा पार्थाची, पर्वा न ठेव मरण्याची ।।४। ।
सत्याकरिता झगडावे, हा नियम अनल हक्का चा।
प्राण हे समर्पुनि द्यावे, हा भाव खऱ्या वीरांचा ।
(अंतरा) बुध्दिच्या चऱ्हाडी चढशी ।
व्हायाञ्भ्यूदय धड़पडशी ।
वन-सिहासम गडगडशी ।
तरि वाट मिळे कीर्तीची, पर्वा न ठेव मरण्याची ।।५॥।
घरगूती कामे आता, सोड रे भारता! सगळी।
कुरकूर वर्ण-जातीची, करजो फुरसदिच्या वेळी ।
(अतरा) कर संघ-शक्ति निर्माण ।
रहा सज्ज धरुनी बाण ।
वाचवी जिवांचे प्राण ।
घे साक्ष दास तुकड्याची, पर्वा न ठेव मरण्याची ।।६॥।।