कोठे गेला सखा राम ?
भाव-कुंज
लडिवाळ प्रार्थना
कोठे गेला सखा राम ? । जीवलग आत्माराम ॥
लपला काय कृष्ण माझा ? । आला सुदामाचे काजा ॥
देवासीही जन्ममरण । लावियले त्या मायेनं ॥
ऐसी माया अनिवार । तुकड्या म्हणे केला घोर ॥