कुणि कृष्ण पाहिला का माझा ?कुणि राम पाहिला का माझा

कुणि कृष्ण पाहिला का माझा ?कुणि राम पाहिला का माझा ? |।धृू० ।।
वृक्ष-लतांनो ! सांगा कुणि तरि,आला का वन बघण्याला ?
मोरमुकुट बन्सीवाला, कुणि कृष्ण पाहिला का माझा?1।।१॥।
पुष्प- गंध आस्वादाया, मधुरंग फुलाचा बघताना ।
दहि-दुध चोरुनि नेताना, कुणि कृष्ण पाहिला का माझा ?।।२॥।
कोकिळ -गाणी ऐकाया प्रभु ! आला का यमुनेकाठी ?।
गोपिंनो ! सांगा हाटी, कुणि कृष्ण पाहिला का माझा?।।३॥।
तुकड्यादास म्हणे वेडा मी, त्या मुरलीच्या विरहाने ।
सांगावा ज्याने त्याने, कुणि कृष्ण पाहिला का माझा ?।।४॥।