वैकुंठासारिखे सोडूनि महाल

वेैंकुठासारिखे सोडोनी महाल । झोपडीत याल कैसे देवा ? ॥
नारदासारिखे सोडोनी गायन । येथे मानपान काय चाले ? ॥
गोपाळांचे सवे सोडोनी खेळणे । इथे का पाळणे मिळे तुज ? ॥
तुकड्यादास म्हणे अंत का पाहसी ? । होईल की हासी जगामाजी ॥