काय देवा ! तुज उचित हे आहे ?
काय देवा ! तुज उचित हे आहे ? । भिकारी की होय भक्त तुझा ।।
नाम घ्याया रुक्मांगद तो लागला । गाव ओस केला त्याचा तुम्ही ।
नाही कोणी ऐसा श्रीमान तो भक्त । पाहता जी अंत काय किती ? ॥
तुकड्यादास म्हणे न कळे का तुम्हा । भक्तालागी प्रेमा द्यावयासी ? ॥