दासाची फजिती वाटे तुज बरी
दासाची फजीती वाटे तुज बरी । दुष्ट लोका करी श्रीमान गा ! ॥
करी जो व्यापार नीतीचा सुंदर । त्याचे घरदार सारे बुडे ॥
नम्रता ठेवील जो काही अंतरी । पडे त्याचे वरी मार साचा ॥
म्हणे तुकड्यादास भक्तासी पाळी गा ! । भरसी का रागा ऐसा देवा ।।