किती सांगू तुज नमन करुनी

किती सांगू तुज नमन करूनी । परी तुझे मनी दया नये ॥ 
सुदाम्यासारिखे दरिद्री पोषिले । महाल दिधले सुवर्णाचे ॥
जरी अजामेळ होता बहू पापी । पुत्रनामे आपी तारियेला ॥
याहुनि पामर तुकड्यादास देवा । पदरी धरावा सांडू नये ॥