घरी माय रडे न मिळे ची अन्न

                      प्रपंचाच्या ज्वालेत 
घरी माय रडे, न मिळेचि अन्न । म्हणे त्यागू प्राण तुजवरी ॥
बाप तो म्हातारा नोहे कामधंदा । नावे माझ्या सदा ओरडतो ॥
मित्र ते छळिती न घे गा ! जवळी । समान ते पाळी कुत्रा जैसा ॥
म्हणे तुकड्यादास किती सांगू तुज ? । देई गा ! सहज प्रेम मज ॥