का रुसला देवराया! अमुच्या या भारता? नच उरला धर्म काही, नच उरली स्वात्मता

(चाल: शिणले हे नेत्र माझे..)

का रुसला देवराया! अमुच्या या भारता?

नच उरला धर्म काही, नच उरली स्वात्मता ।।धृ० ।।

चह वर्णा नाश झाला, शिरलीसे भ्रष्टता।

बहु पंगू देश झाला, अजुनी का पाहता ?।1१॥।

विरवृत्ती नष्ट झाली, घरि आली लोलता।

दास्याची बंध-बेडी, करि पडली पाहता।।२॥।

घाबरला जीव माझा, न टिके ही शांतता]

धावत ये सत्वरी बा ! दे हृट्या धीरता।|1३॥।

नच दुसरी आस आता, बल देई ऐक्यता।

ये तोडी श्रुंखला ही, तुकड्याची तू स्वता।।४॥।