कर्माचा अभागी, वंशाचा मी त्यागी
कर्माचा अभागी, वंशाचा मी त्यागी । शरीराचा रोगी झालो देवा ! ॥
नाही कोणी दिन उदेला जी ! ऐसा । रामनामी खासा डुललो मी ॥
मायबाप गोत गांजिती ते फार । सुखाने डिंगर वाया गेला ॥
तुकड्यादास म्हणे यातना भोगणे । तुटेल हो जेणे ऐसे करा ।