शरीर हे रोगी बहु झाले माझे

शरीर हे रोगी बहू झाले माझे । उचली गा ! ओझे सकळीक ॥
श्वास कफादिक उमळले मज । उद्धरी सहज रामराया ! ॥
नाही मानपान नितिधर्म काही । व्यसन ते पाही दुष्ट मज ॥
म्हणे तुकड्यादास कैसे करू आता ? । येई जगत्राता ! धावोनिया ॥