शिनली ही वाचा, नेत्री ये अंधारी

शिणली ही वाचा, नेत्री ये अंधारी । अजूनी का हरी! दया नसे ? ॥
उदार तू होसी म्हणती संतजन । आता का कृपण झाला राया ? ॥
जाईल गा ! ब्रीद सर्व तुझे वाया । भक्तासी सखया ! न तारिसी ॥
तुकड्यादास म्हणे सांभाळी गा आता । कंठ माझा त्राता सुकला से ॥