गाइन मी तुज गोड प्रभू! पण भेट सख्या! मज देशिल का?
गाइन मी तुज गोड प्रभू! पण भेट सख्या! मज देशिल का?
मी ठेविन हृदयी अपुल्या, पण निजधामा मज नेशिल का?1|धृ०।।
कोकिळ रिझवी मधुरावाजे, मृग निववी निज नयनाने |
वन सुखवी तृण-पुष्पलताने, भक्ति-सुधारस पीशिल का? ।।१॥
पुष्प डोलवी गंध-भराने, रंग मधुरसा दावुनिया।
घन सुखवी, करर मंद मंद जल, प्रेमाच्छादन घेशिल का?।।२॥।
पवन करी तुज प्रसन्न झुळझुळ, सभोवताली वाहूनिया ।
तुकड्यादास म्हणे मन घे, पण तू माझा हरि! होशिल का? ।।३॥