वैराग्य ते मज आले नाही देवा !

वैराग्य ते मज आले नाही देवा ! । मिष्टान्न केशवा ! गोड लागे ॥
क्षणिक वैराग्य येतसे अंगासी । वाटे हो ! मानसी दुष्ट झालो ॥
जग चित्र दिसे सामोरी जोवरी । तोवरी श्रीहरी-भेटी केवि ? ॥
तुकड्यादास म्हणे उरलासे रड । व्यर्थचि बडबड, शीण झाला ॥