जगाचे ते प्रेम सुटे अजूनी

जगाचे ते प्रेम न सुटे अजुनी । वाटे क्षणोक्षणी काय करू ? ।
सोडोनिया घर फिरो देशोदेशी । वाटते मानसी दृष्ट झालो ॥
मायबाप घरी ओरडती फार । वैराग्याची धार सुटे तेणे ॥
तुकड्यादास म्हणे येई गुरुराया ! । पापी हा ताराया भवसिंधू॥