घरी शूरपणा दावितो मी मोठा
घरी शूरपणा दावितो मी मोठा । खातो पुढे सोटा शत्रुद्वारी ॥
एक-चार-पाच शत्रू थोर थोर । करिती अव्हेर शरीराचा ॥
क्षमा-शांति-दया नाही हो अंतरी । कुठे गेला हरी! खेळावया ? ॥
सांगती ते साधू घटी राही देव । नाही शुद्ध भाव माझ्यापाशी ॥
म्हणे तुकड्यादास कृपण का होसी? । दे भेटी मजसी त्वरित गा ॥