सोडशील का माया माझी ? श्रीपंढरिराया !

(चालः पतीत पावन नाम...)
सोडशील का माया   माझी ?   श्रीपंढरिराया ! ।
कोण लाज राखील ? देह हा जाइल गा ! वाया ।।धृ०।।
काम-क्रोध मद-मत्सर सारे, जमले वळवाया ।
भक्ति- आड येऊनि, भाव तो  नेती ओढूनिया ॥१॥
मन चंचल, कधि स्थीर राहिना, पहाते फसवाया ।
बुद्धीने वेष्टिला जीव हा, काय सांगु  सखया ! ॥२।।
तूच गड्यारे ! गडी कोण मग येई ताराया ? ।
सगे - सोयरे पळती   सारे,   जमले   ओढाया ॥३॥
तुकड्यादासा तुझा भरवसा, कोणी मग नाही ।
पुरा जाणला विचार याचा, ने अपुल्या  पायी ।।४।।