हस एकदा तरी हस रे ! कुंजविहारी !

(चालः दिवाना बनाना हो तो...)
हस एकदा तरी हस  रे !   कुंजविहारी ! ।
त्या गोजिऱ्या रुपाची मज लागु दे तारी ।।धृ०।।
कंठात वैजयंती, कानात कुंडले ती l
शिरि मोरमुकुट झळके, किति केस कुरळ ही ती ।
किति गोड नेत्र हे,  अधरी   सुरस   बांसरी ।।१।।
बघताचि तुझी वाट, जिव हा वेडियापरी ।
बेचैन सदा राही,   मन   वृत्ति    बावरी l
सलास तसा  बोल  सख्या !   एकदा   तरी ।।२।।
मन बावरे अता हे तव ध्यान सोडि ना ।
बैस जन्मजन्मिचीही, ती हरलि कल्पना ।
तुकड्यास पदी घे अपुल्या, आस कर पुरी ।।३।।