हरि आठवा मनी अपुल्या, भाव धरोनी

(चाल: दिवाना बनाना हो तो... )
हरि आठवा मनी अपुल्या, भाव धरोनी ।
सोडूचि नका त्यासि कधी, जागृति, स्वप्नी ॥धृ०।।
संसार भूल सारी, हा भ्रमचि ओसरा ।
हरि ठेवितसे या जीवा, वागु द्या बरा।
सुख-दुःख सोसवोनि सदा, ध्यास घ्या मनी ।।१।।
ध्यानि धरा हरी नयनी, अंतरंगि या।
रमवा सदा तयासी जिवी, आळवोनिया।
तुकड्या म्हणे मिळे  प्रभु   हा, येई   धावुनी ॥२।l