हरिभक्त लाडका हरिचा, ना दुजा कुणी
(चाल: दिवाना बनाना हो तो...)
हरिभक्त लाडका हरिचा, ना दुजा कुणी ।
त्या मुक्त कराया येई, वैकुंठ सोडुनी ।।धृ०।।
प्रल्हाद रक्षिला प्रभुने, वधुनि कश्यपू ।
दे मोक्ष गजेंद्रालागी, हटवुनी रिपु ।
पुरवीत चीर द्रौपदीला, रूप घेउनी ।।१॥
धरि लाजपांडवांचीहि रक्षिले तया ।
ध्रुव बाळ भक्ति करिता, त्या देत आश्रया ।
तुकड्या म्हणे हरी ध्या हो ! भक्ति करुनी ॥२।।