आवडली भक्ति आम्हा, हरिचीया पायिची
(चालः शिणले हे नेत्र माझे...)
आवडली भक्ति आम्हा, हरिचीया पायिची ।
त्याविण ना सूख वाटे, या देहा अन्यची ।।धृ०।।
तुटकीशी झोपडी ही गमते महालापरी।
जव नांदे भक्ति-भावे, माझा तो श्रीहरी ।।१।।
कुंपण अणि बोरिबारी, गमतो हा बागची ।
तुळशीची दाट झाडी, शोभा ही स्वर्गिची ।|२।।
अम्हि हरिचे म्हणविताना, बहुमाना पावतो।
ऐश्वर्य फोल सारे, त्याविण ते समजतो ।।३।।
जरि न मिळे अन्न खाया, ल्यायासी चिधडी ।
तुकड्याची रंगि रंगो, हरि - भक्ती चौघडी ।|४।l