गुरु - बोधावाचुनीया, पथ नाही मुक्तिचा

(चालः शिणले हे नेत्र माझे...)
गुरु - बोधावाचुनीया, पथ नाही   मुक्तिचा ।
बोधाने सुलभ होई, पथ प्रभुच्या भक्तिचा ।।धृ०।।
विण भक्ति ज्ञान नोहे, प्रभुचीया सृष्टिचे।
विण ज्ञाने व्यर्थ होते, कळणे हे.  व्यष्टिचे ।।१ll
जरि कळले देह-धर्मे, कळणेची ते नव्हे।
जरि वळले एकपोटा, वळणेची हे   नव्हे ।|२।।
म्हणुनीया संत गाती, गुरु-भक्ती सर्वदा ।
तुकड्याची हाक तेची, गुरु शोधावा सुदा ।|३।।