श्रीहरिच्या प्रेमळांनो । घ्या पदरी बालका

(चालः शिणले हे नेत्र माझे...)
श्रीहरिच्या प्रेमळांनो । घ्या पदरी बालका ।
जरि पापी भ्रष्ट  कर्मी,   अज्ञानी   होइ    का ।।धृ०।।
प्रभु तुमच्या ओळखीने, दीनासी भेटतो ।
तुमचीया    एक    बोले,   कार्यासी    कष्टतो ।|१।।
ति चिंता लागलीसे, जिवभावापासुनी ।
प्रम भेटो,   रूप   दावो, ही   आशा   मन्मनी ।।२।।
पच्च डोळे त्याविना हे, राहताती शांतसे ।
सुकंड्याची हाक घ्या हो ! मज काही ना सुचे ॥३॥