हरिनाम मधुर मनि गाइ सदा

(चालः जोगन खोजन निकली है...)
हरिनाम मधुर मनि गाइ सदा । गुरुवचनी निर्भय राहि सदा ॥धृ0॥
सोडुनिया ही विषय-चिंतना, माया-मोह-विकारांची ।
सद्विचार मनि वाहि सदा, गुरु - वचनी० ll१।।
अखिल जगाचा चालक तो प्रभु भाव असा दूढ ठेवुनिया
ममतेने जग पाहि  सदा, गुरु - वचनी0 ।।२।।
असत्यता ही नष्ट करोनी, नीतीने संसार करी।
जन सेवा-श्रम साहि सदा, गुरु-वचनी0 ।।३।।
तुकड्यादास म्हणे, इहपर घे गोड करुनिया या देही ।
आत्म्याची घे ग्वाहि सदा, गुरु - वचनी०।।४।।