श्रीहरि-ध्यान धरि हृदयी, जा जिवा !
(चाल: हरि भगवान कुंजवनी..)
श्रीहरि-ध्यान धरि हृदयी, जा जिवा ! सुखद हा मार्ग तुला ।।धृ०।l
सांगति संत-महंत सदा हे, शास्त्र-पुराण-श्रृती-वचने ।
जामजपाविण शांति न लाभे, धर धावुनिया पद्युगुला ।।१।।
मेगयागविधि कठिण तपस्या, साधति काय कुणास अंता ? ।
चल मन हे फिरतचि राहे, भृंग जसा घे मोद फुला ।।२।।
दकड्यादास म्हणे हो पावन, नामस्मरण करुनि भावे ।
वैळ पुन्हा ही न मिळे ऐसी, साधुनि घे हा जन्म भला ।।३।।