जनलोक म्हणती थोर I

जनलोक म्हणती थोर । परी आम्ही अजुनी ढोर ।।
नाही चित्ता समाधान । अखंड स्वरुपी संधान ॥
भंगे पडे क्षणोक्षणी । फिरे मन बाह्य वनी  ॥
तुकड्या म्हणे आहे आस । हरि तारो या मूढास ।।