अजुनी साधेना तो योग I

अजुनी साधेना तो योग । कठिण वाटतसे मार्ग ॥
भक्ति न घडे अखंड । मार्गी विघ्ने ही उदंड ॥
वाटे कोठे जावे रानी । व्याधी उपाधी सोडोनी ॥
तुकड्या म्हणे शीण आला । बघुनी जगाचा गलबला ॥