ऐसे वाटे माझ्या मनी I

ऐसे वाटे माझ्या मनी । जावे सर्व हे सोडुनी ।।
नसती लागली उपाधी । जन लोकांची ही व्याधी ॥
आम्ही बरे होतो तेव्हा । गाऊ अरण्यी केशवा! ॥        तुकड्या म्हणे लोकेषणा । देवा! बाधू नये कोणा ॥