हाजी हाजी या लोकांची I

हाजी हाजी या लोकांची । आता न रुचे मना साची ॥
वाटे व्यर्थ हा बाजार । अर्थ नाही तिळभर ॥
दिसती डोळा शेकड्यांनी । परी काम न दे कोणी ॥
तुकड्या  म्हणे हे स्वार्थाचे । निष्कामी जे ते आमूचे ॥