काय जनाचे हे सुख I

काय जनाचे हे सुख । जे का नामासी विन्मुख ॥
वरी वरी यांच्या भावा । कोण फसेल केशवा! ॥
क्षणी लाखो जमा होती । प्रसंग येताचि पळती ॥
तुकड्या म्हणे ऐसे जन । जैसे वादळाचे स्थान ॥