आम्हा न वाटे साजिरे I

आम्हा न वाटे साजिरे । लोक जमती हे सारे ॥                दावा कोणा भावे रुचे । गुण तया भगवंताचे  ?॥
सर्व स्वहिताचे जन । जमती लोभाच्या आशेन ॥
तुकड्या म्हणे पाहती मजा। कोणी न घे भक्ति गुजा ॥