काय होते आमुच्याने I

काय होते आमुच्याने । कोणा चमत्कार दावणे ॥
आम्ही नाही जादुगार । आहो भोळे भाळे नर ॥
भक्ति करायाची आस । म्हणोनि जाहलो उदास ॥
तुकड्या म्हणे संत नामी । फुके नका पाडू ऊर्मी ॥