शिकविते ज्ञान का गीता, बना हो सर्व संन्यासी ?
(चालः अगर है ग्यान को पाना...)
शिकविते ज्ञान का गीता, बना हो सर्व संन्यासी ? ।
सोडूनी धर्म हे सारे, घरामधि झोप घ्या खाशी ॥धृ०।l
वाहवा ! अर्थ करणारे, अणि लोकांसि वदणारे ।
भ्याडयण लावुनी सारे, राष्ट्र हे लावले फाशी ॥१॥
वीरांना भक्ति लावूनी, टाळ देऊनिया हाती।
पिटविले टाळके त्यांचे, बनवुनी दास अणि दासी ॥२॥
अर्थ या भक्ति-ज्ञानाचा, असा नाहीच कोठेही।
मेलियापरि जगी रहावे, वाढवोनी उरी खासी ।।३॥
गीता हे सांगते सर्वा, लढा अन्याय-प्रतिकारा ।
प्रभू हा साथ दे सर्वा, धर्म हा श्रेष्ठ सर्वासी ।।४॥
महणे तुकड्या अहंकारा, न धरता मर्द व्हा सारे ।
जवा धर्म सत्याचा, जागवा भारतीयांसी ।।५॥