करा काही कृपा आता, किती पाहता मती माझी ?
(चाल : अगर हे शौक मिलने का...)
करा काही कृपा आता, किती पाहता मती माझी ?
पुरेना मी कसवटीला, कळेना का तुम्हाला जी 1! ॥श्व०॥
मनाची धाव ही थोडी, पुरेना ध्यान करण्याला ।
भरारी घेत विषयाची, सदा देई दगाबाजी ।1१॥।
मिळेना संगती कोठे, कुणीतरी बोध करण्याला ।
लुबाडे-संत हे फिरती, जया द्रव्याचि ये हाजी ।।२॥।
भला संसार-ओढा हा, मिळेना भीक भक्तीला ।
दान हे स्वार्थि-लोकांचे, करी बुध्दि सदा पाजी ।1३ ।।
उणे जरि कार्म हे माझे, भरा तरि सहज लीलेने ।
फजीती ही पुरी वाटे, बना तुकड्याचिये गर्जी ।।४ ।।