सुखाचा दिवस तै आला, कि जेव्हा भिन्नता गेली
(चालः अगर है ग्यान को पाना...)
सुखाचा दिवस तै आला, कि जेव्हा भिन्नता गेली ।
बुद्धिच्या पूर्ण भावाची, विलिनता रामरुपि झाली ।धृ०।।
न अपुली वाटली काया, न जनता जिवपणे स्फुरली ।
राममय विश्वची सारे कि, प्रभु - माया खरी नटली ।।१॥
न भ्रांती अंतरी काही, न कमे कामनेचीही ।
निसर्गे बागही फुलली, निसर्गानेच सुखि झाली ।।२॥
न काही कामना उरली, धर्म - कर्मे उठाठेवी ।
म्हणे तुकड्या गार जैसी, जली दिसली तशी मुरली II३॥